List of all our e-Snehabandh publications till date
Snehabandh
नमस्कार मंडळी
स्नेहेन बन्धति इति ‘स्नेहबंध‘..!मराठी भाषिक मंडळ, टोरोंटोचा हा एक सातत्याने कार्यान्वित असलेला उपक्रम गेली कित्येक वर्षे अव्याहत चालू आहे. आपल्या समाजातील जुने–जाणते, सिद्धहस्त लेखक ते अगदी लिखाणाच्या क्षेत्रात धडपड करून सुरेख साहित्य निर्मिती करणारे उदयोन्मुख लेखक, बाल–लेखक, अशा विविध प्रकारच्या लेखकांना एक साहित्यिक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम हा अंक करत आहे. अनेक संपादक आणि कार्यकारिणी समिती ह्या उपक्रमाचा एक अविभाज्य भाग होत्या, आहेत आणि भविष्यातही होतील आणि साहित्याच्या स्नेहात मराठी माणसाला बांधणारं स्नेहबंध नावाचं हे अतूट बंधन कायम राहील.
लेख–कविता ह्याव्यतिरिक्त, लहान थोरांनी काढलेली चित्रं, आरोग्यविषयक आणि किचन टिप्स, अध्यात्माविषयी निरूपण इत्यादी देखील अंकांमधे समाविष्ट केले गेले आहेत. एकूणच, मंडळाच्या सभासदांच्या साहित्य आणि कला विषयक व्यासंगांना ह्या माध्यमातून भरपूर खतपाणी घातलं जातं आणि प्रोत्साहितही केलं जातं. वेबसाईट लिंक मुळे हे अंक आपल्याला कधीही वाचनासाठी उपलब्ध आहेत. तर मंडळी, नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय जरूर आम्हाला कळवा.
वारसा – आता आपण स्नेहबंध च्या जून्या अंकांना भेट देऊ शकता खालील लिंक द्वारे देखील
कळावे, लोभ असावा
संपादक – स्नेहबंध
मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो
If you have any suggestions please send us an email at snehabandh@mbmtoronto.com