
३७ वे मराठी साहित्य संमेलन (In-Person)
मराठी भाषिक मंडळ खास टोरोंटो मध्ये राहणाऱ्या मराठी लेखकांसाठी, कवींसाठी आणि विचारवंतांसाठी घेऊन येत आहे,
“३७वे टोरोंटो मराठी साहित्य संमेलन”
आपले विचार व्यक्त करण्याची, आणि साहित्य प्रेमींसाठी, लेखकांच्या तोंडून त्यांची निर्मिती ऐकण्याची एकमेव संधी.
‘बाल साहित्य’ सादरीकरण हे या संमेलनाचे खास आकर्षण असेल. आपल्या मुलांना मराठी लिहिण्या आणि वाचण्याबरोबर, त्यांचे लिखाण सादर करण्याकरता एक उत्तम प्लॅटफॉर्म!
Note:
- वय व विषयाचे बंधन नाही
- आपले लिखाण वाचायला ७-८ मिनिटे वेळ मिळेल
- साहित्य स्वरचित, स्वलिखित आणि मराठीतच असावे
- लिखाण पाठवतांना त्यासोबत पूर्ण नाव, फोन नंबर आणि लिखाणाचा प्रकार (कथा, कविता, प्रवासवर्णन, पत्र, लेख इ.) पाठवावा.
- वेळेच्या बंधनामुळे ई-मेल वर येणाऱ्या साहित्यिकांना FIRST COME FIRST SERVE बेसिस वर प्राधान्य देण्यात येईल.
- वाचन होणाऱ्या लिखाणाची जबाबदारी संबंधित लेखकाची असेल. मराठी मंडळ आणि कार्यकारिणी समिती त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही
- लिखाण वाचण्यासाठी लेखकांनी स्वतः संमेलनाला हजर असणे आणि संमेलनाचे तिकीट विकत घेणे बंधनकारक आहे
- साहित्यिकांनी आपले लिखाण १५ मार्च पर्यंत sahitya@mbmtoronto.com या पत्त्यावर पाठवावे.
संमेलनाची तारीख – 5 एप्रिल 2025
संमेलनाची वेळ- दुपारी 1-4
संमेलनाचं ठिकाण – Auditorium Room B, Barbara Frum Public Library, North York (पार्किंग उपलब्ध)
तिकीटाची किंमत –
MBM Member 2025: प्रत्येकी $7
Non-Members: प्रत्येकी $12
Ticket Link: https://www.tugoz.com/events/mbm/sahityasammelan2025
(मेंबर डिस्काउंट साठी मेम्बरशिप विकत घेता येईल- https://www.tugoz.com/events/mbm/membership-2025 )
Sponsorship Enquiries- Please email us at president@mbmtoronto.com
-MBM Team 2025