किरण जोशी, दिघी, पुणे
पिंपरी चिंचवड येथील ८९ व्या साहित्य संमेलनात सादर केलेली माझी कविता
आजही भुकेला
अदृष्य कणांतील मातीच्या
दृश्य खुणांतील सृष्टीच्या
धुंद क्षणातिल फुलपाखरांच्या
सप्तरंगांचा भुकेला
…हा चित्रकार “आजही भुकेला”
..अढळ पदी बाळ ध्रुवाच्या
गदा प्रहरी बल भीमाच्या
शरपंजर पितामह भीष्मांच्या
प्रतिज्ञेचा भुकेला…..
…हा काळ “आजही भुकेला”
श्रीराम वृध्द शबरीच्या
श्रीकृष्ण मिरा रधिकेच्या
श्री विठू मुक्ता जनाईच्या
भाव भक्तीचा भुकेला…
…हा देव “आजही भुकेला”
निद्रा स्वप्नातील हरिशचंद्राच्या
कवच कुंडलातील कर्णाच्या
नतमस्तक बळीराजाच्या
थोर दानाचा भुकेला……
…हा याचक “आजही भुकेला”
लक्षवेधी अर्जुनाच्या
उदरगर्भातील कचाच्या
एकाचित्ती एकलव्याच्या
गुरू दक्षिणेचा भुकेला
…हा गुरू “आजही भुकेला”
रामराज्यी विर हनुमंताच्या
शिवराज्यी जीवा, ताना, बाजीच्या
या स्वराज्यी आपणा सर्वांच्या
निष्ठेचा भुकेला..,.
…हा देश “आजही भुकेला”
बंधू भगिनिंतील. स्वामींच्या
सत्य अहिंसेतील महात्म्याच्या
अविरत सेवेतील मदरच्या
माणुसकीचा भुकेला.,.
,,,हा माणूस “आजही भुकेला”
अणु भडका थोपविण्या
ज्ञानदीपे ज्ञानेश्वरीच्या
तींहीलोका सुखिया करण्या
विश्र्वशांतीचा भुकेला……
…हा ज्ञानदेव “आजही भुकेला”
Very very nice 👍🙂
Very nice 👌