MBM Toronto गणेशोत्सव 2019

गणेशोत्सव 2019 - MBM TORONTO

नमस्कार मंडळी...

ऑगस्ट-सप्टेंबर मधे सर्वांना आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात. सर्वजण उत्सुकतेने आपल्या मंडळाच्या गणेशोत्सवाच्या घोषणेची वाट पाहात असतात. तर मंडळी, तुमची उत्सुकता जास्त ताणून न धरता, आम्ही गणेशोत्सवाबद्दल खालील तपशील देत आहोत...

दिनांक - ८ सप्टेंबर २०१९
स्थळ - मायकेल पावर हायस्कूल, मिसिसागा
वेळ - सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.
कार्यक्रमाची रूपरेषा -
सकाळी ९.३० ते १२ गणेशपूजन, मिरवणूक व विसर्जन
दुपारी १२.३० ते २ पोटोबा
दुपारी २.३० ते सायंकाळी ६ विविध मनोरंजनाचे कार्यक्रम
नोंदणी शुल्क (तिकिट) - लवकरच घोषित केले जातील. Stay tuned..!

तिकीट विक्री मधून जमा झालेल्या रकमेमधून खर्चाचा भाग वजा जाता, जी रक्कम उरेल त्याचा काही भाग सेवाभावी संस्थांना दान करण्याचा अभिनव उपक्रम यंदा योजला आहे. अर्थात, तो सफल होण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती!

गणेशोत्सव प्रायोजकत्व -

श्री गजाननाच्या कृपेने आपल्या समाजात आज अनेक यशस्वी उद्योजक व व्यावसायिक आहेत. त्यापैकी कुणालाही गणेशोत्सवासाठी काही देणगी / sponsorship द्यायची असेल, तर त्यांचे स्वागत आहे. त्यासाठी MBM अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांच्याशी खालील ईमेल ID वर संपर्क साधावा: president@mbmtoronto.com

श्री गणेश पूजन

श्री गजाननाची पूजा करण्यासाठी एक अफलातून योजना आम्ही आखली आहे. ज्या विवाहित जोडप्यांना पूजा करण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांची नावे आमच्याकडे 20 ऑगस्टपर्यंत नोंदवावीत. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी एका लकी ड्रॉ द्वारे एका जोडप्याची पूजेसाठी निवड केली जाईल. महत्त्वाचं - पूजा करणाऱ्या जोडप्याने श्री गणेश मूर्ती व प्रसाद यांची व्यवस्था करावी याची कृपया नोंद घ्यावी. secretary@mbmtoronto.com

आता मनोरंजनाच्या कार्यक्रमांबद्दल थोडंसं...

1. मंडळातील बच्चेकंपनीने सादर केलेलं पु. ल. देशपांडे लिखित अजरामर बालनाट्य 'विठ्ठल तो आला आला...'
2. छोट्या-मोठ्यांची नृत्यस्पर्धा अंतिम फेरी (MBM idol -dance competition Grand Finale)
3. आणखी एक good news... स्थानिक सभासदांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक खुला रंगमंच उपलब्ध करून देत आहोत. आपण आपली कोणतीही कला सादर करण्यासाठी व दृश्य स्वरूपातील कला (उदा. विविध प्रकारची चित्रकला, हस्तकला, पुष्प रचना (flower arrangements - ikebana), फुलांची रांगोळी, विज्ञान प्रकल्प वगैरे सादर करण्यासाठी आमच्याकडे नोंदणी करू शकता.

आपली कला सादर करण्यासाठी, खालील तपशील kala.vibhag@mbmtoronto.com या ईमेल id वर पाठवा.

व्यक्ती अथवा ग्रुपचे नाव -
व्यक्तीचे वय -
काय सादर करणार -
लागणारा वेळ -
अतिरिक्त माहिती (ऐच्छिक) -
MBM सभासद (आहे / नाही) -

कृपया नियम जरूर वाचा.

1. आपली कला आपण स्वतंत्रपणे किंवा ग्रुप मधे सादर करू शकता.
2. स्वतंत्र कला प्रकारात गायन, स्टँडप कॉमेडी, मिमिक्री, सँड आर्ट, एकपात्री प्रयोग समाविष्ट असतील. वेळ - १० मिनिटे मॅक्स.
3. ग्रुप कला प्रकारात छोटी एकांकिका, नृत्य, समुहगान समाविष्ट असतील. वेळ - १५ मिनिटे मॅक्स.
4. यासाठी लागणारी सामग्री (props) ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असेल.
5. नावे नोंदवण्याची अंतिम तारीख - २५ ऑगस्ट २०१९.
6. आपल्या कलेचा एक शॉर्ट व्हिडिओ आमच्याकडे पाठवा (अनिवार्य - compulsory). त्यासाठी शेवटची तारीख ३१ऑगस्ट २०१९. ही अट दृश्य कलेसाठी लागू नाही.

चला तर मग, नावं नोंदवा आणि जोमानं तयारीला लागा. बोला...गणपतीबाप्पा मोरया

MBM TORONTO