नमस्कार, माझे नाव अद्वैत केळकर आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या मुंजीबद्दल सांगणार आहे. माझ्या आई बाबांनी मी सात-आठ वर्षांचा असताना मला मुंजीबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. मुंज कशी करतात आणि का करतात याबद्दल सांगितलं होतं. मला एक गोष्ट आवडली नाही आणि ती होती माझे केस कापले जातील आणि मी टकला होणार. मला माझे केस फारच आवडतात, गोटा घेऊन मी इथे शाळेत जाऊ शकत नाही म्हणून मी आई बाबांना मुंज करायलाच नको असे म्हणत होतो. तेव्हाच इथे राहणाऱ्या माझ्या एका मित्राची पुण्यात जाऊन मुंज झाली. त्या मुंजीचे फोटोस आणि videos पाहून मला मुंज करावी असे वाटायला लागले. ह्यानंतर covid pandemic चालू झाले आणि माझ्या मुंजीची चर्चा थांबली. दोन वर्षानंतर covid चे vaccine आले आणि परत मुंजीची चर्चा घरात चालू झाली.
२०२२ च्या मार्च मध्ये घरात मुंजीचे planning चालू झाले. मुंज सांगलीच्या आमच्या वाड्यात मंदिरात करायचे ठरले. मेनू ठरवताना माझे कोणी ऐकतच नव्हते. मला खरं तर पनीरची भाजी, समोसा आणि पिझ्झा असा मेनू हवा होता. शेवटी मी चिडलो आणि सगळ्यांना ठणकावून सांगितले कि माझी मुंज आहे तर मेनू मी ठरवणार. सगळ्यांनी माझे ऐकले. पनीरची भाजी आणि सामोसा मेनू मध्ये add केला आणि पिझ्झा हळूच काढला. तसे माझे आई बाबा एकदम चलाख आणि लाखात एक आहेत. पुण्यात आणि सांगलीत कपडे कुठे घ्यायचे हे ठरले. आजी आजोबा आणि आई बाबा कोणाकोणाला बोलवायचे ह्याची लिस्ट करायला लागले.
ऑगस्ट २०२२ मध्ये आजी आजोबा इथून सांगलीला आधी तयारीला गेले. आई बाबा आणि त्यांचे कॉल वर भरपूर प्लांनिंग चालायचे. शेवटी आम्ही इथून २१ नोव्हेंबरला सांगलीला जायला निघालो. सांगलीमध्ये पोचल्या पोचल्या आम्ही तयारीला लागलो. कपडे खरेदी, सोने खरेदी, decoration, menu अशा सगळ्या गोष्टी finalize झाल्या. बऱ्याच जणांनी केळवण केले. अरे हो, इथून निघायच्या आधी इथल्या आमच्या family friends नी देखील मस्त केळवण केले होते. तेव्हा मला कळले कि केळवण काय असते ते आणि मग आता मुंजीचा दिवस आला. मुंजीकरता आम्ही सगळ्यांनी छान छान कपडे घातले. तसा मी बराच वेळ सोवळ्याच्या चड्डीतच होतो,गुरुजी बरेच काही मंत्र म्हणत होते आणि सगळे मला चिडवत होते का तर माझा गोटा केला जाणार होता. माझा गोटा करून झाल्यानंतर बाबांनी मला गायत्री मंत्र सांगितला , मला जानवं घालायला दिले , मातृभोजन झाले, त्यानंतर माझी मुंज लागली, माझे सारे भाऊ बहीण इतक्या जोरात अक्षता टाकत माझ्या टकलाचा जणू काही वेधच घेत होते , त्यानंतर आईने मला भिक्षा दिली आणि मला नमस्कार सुद्धा केला, सगळे विधी पूर्ण होऊन जेवण चालू झाले. मी जेवायची फार वाट पाहत होतो पण इथे आमचे photos complete झाले तर ना! माझी US मध्ये राहणारी एक बहीण तर buffet होता म्हणून ३-४ वेळा जेवली आणि मी बसलो होतो pose देत!
मग मुंजीनंतर संध्याकाळी मारुतीचे दर्शन घेऊन आल्यावर भिक्षावळ झाली. मुंजीत मला भरपूर सारे गिफ्ट्स आणि पैसे मिळाले होते. मुंजीनंतर आम्ही कोकणात देव दर्शनाला गेलो. कोकणातले रस्ते फारच horrible होते. turns इतके होते की काय सांगू! कोकण ट्रिप नंतर आम्ही टोरोंटोला आलो तेव्हा डिसेंबर ब्रेक होता. ब्रेक च्या शेवटी जेव्हा मी हेअर कट करता गेलो तेव्हा हेअर कट करणारी बाई माझा हेअर कट पाहून चाटच पडली होती आणि तिने आईला विचारले कि हा असा ह्याचा हेअर कट तुम्ही का आणि कुठे केला?? January मध्ये शाळा चालू झाली तेव्हा माझा नॉर्मल हेअर कट घेऊन मी मोठ्या दिमाखात शाळेत गेलो.
Thank you !
अद्वैत केळकर