नविन साधकचे मनोगत

नविन साधकचे मनोगत

मी शरीर नाही मन नाही

तर आहे कोण मी? २

सा -सारखा दीर्घ श्वास,

कि, सु-सारखा ह्रस्व?

कोणताही घेतला तरी

शरीर लाभलेला श्वासच आहे मी!

शरिरात श्वास भरला

म्हणूनच मी, मी झालो!

शरिरात श्वास भरला

म्हणूनच मी, मी झालो!

मी ह्रस्व-दीर्घ श्वास अभंग 

जस कवितेला शब्द छंद.

व्याधी नसेल एकही आंत

शारिरा-मनात.

व्याधि-विकार नाके-बंदी,

श्वासाचा खडा पहारा.

आत्मने मज लाभेल संधि

होइल आत्मानंद सारा.

चंद्रहास जोग

Leave a Comment