आत्मस्तुती

हो आज मी आत्मस्तुती करणार आहे. या वर्षी जुलै १ला माझ्या व्यावसाईक ड्रायविंग शिकवण्यास ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे मी आज सिन्हावलोकन करणार आहे. मराठी समाजातील मी पहिला आणि कदाचित भारतीय शिक्षकातील सुद्धा प्रथम ५ तिल एक आहे. गेल्या ५० वर्षात मी खूप स्थितंतरे पहिली. प्रथम माझे ९०% विद्यार्थी स्थानिक, गोरे लोक होती, मग हळूहळू भारतीय जास्त झाले. अर्थातच ट्रॅफिक, आणि ड्रायवर  

मध्येही आमूलाग्र बदल झाला आहे. आज मी तिसरी पिढी शिकवत आहे.    

विद्यार्थीबाबत पहिले, तर अजिबात इंग्लिश न येणारे, काही अपंग, काही ७० च्या पुढचे, यांना गाडी शिकवून  लायसेंस मिळवून देण्याचा अनुभवच वेगळा. त्यातून एका मध्यमवयीन बाई, जिचा नवरा तिच्या समोर गाडीत अपघातात गेला, तिला शिकवण्यात ज्या अडचणी आल्या त्या आठवतात. 

तसेच काही विनोदी प्रसंगही आठवत आहेत. गाडी चालवताना रस्त्यावरील साचलेले पाणी गाडीवर उडल्यावर, डोळे मिटणारा, अथवा एक झाडाची फांदी गाडीवर घासल्यावर मान खाली करणारा, अथवा गाडी वळवताना सबंध शरीर डावीकडे वा उजवीकडे झुकवणारी,टेस्ट नापास झाल्यावर टेस्ट ची फी परत मागणारा, सीटला शिट, centennialला सेंटीमेन्टल किंवा pedestrianला pediatrition म्हणणारा माझे टेंशन हलक करत असे. 

जेथे यश तेथे स्पर्धा येणार हे मी जाणून होतोच,म्हणून मी गियर शिफ्ट गाडी शिकवू लागलो, सुदैवाने स्कारबरोमध्ये गियर गाडी शिकवणारा मी एकमेव शिक्षक होतो. त्याच जोडीला मी मोटर सायकल, ट्रक, टॅक्सी ही लायसेन्स पण घेतली आणि ते पण शिकवले. गमतीची गोष्ट ही की टॅक्सी ड्रायवर बनायला पण कोर्स करावा लागत असे, त्या वेळी जीपीएस नसल्याने रस्ते कसे शोधायचे, ते पर्लि या पुस्तकाच्या माध्यमातून, थोडक्यात मॅप रीडिंग शिकवावे लागत असे. तसेच मी कम्यूनिटी कॉलेज मध्ये ड्रायविंग instructor कोर्स शिकवले. मी मास्टर instructor असल्यामुळे, ज्या ड्राईवर मेडिकल कारणाने किंवा demerit पॉइंट असल्यामुळे लायसेंस रद्द झाले आहे त्यांचे लायसेंस मला पुनर्जीवित करता येते.  

मी रोज ८/१० तास रस्त्यावर असल्यामुळे, मला रस्त्यावरच्या समस्या माहीत होत्या. त्यावर मी १९७८ आणि ८० साली रीपोर्ट लिहून स्कारबरो काऊंसिलला सादर केला, १९८९ मध्ये हिंदीमध्ये लेखी परीक्षा/knowledge टेस्ट, किंवा ज्याला आज G1टेस्ट म्हणतात ती तयार केली, आजही ती वैध आहे.

१९९४ मध्ये graduating लायसेंस पद्धत ऑंटॅरिओ मध्ये सुरू झाली त्याच्या सल्लागार समितीवर मी काम केले होते. तसेच driving school association of Ontario आणी Canadian professional driver educators association मी पदाधिकारी होतो. 

वर्ष २००० मध्ये मला आणि माझी पत्नी, माझ्या व्यवसायातील सहयोगी सरिता, आम्हा दोघास कॅनडा सरकारतर्फे outstanding Canadian म्हणून सन्मानित केले होते. २०२२ मध्ये ड्रायविंग स्कूल असोसिअनने मला १५००० विद्यार्थी शिकवल्याबद्दल,आणी २०२३ मध्ये लाइफ टाइम आचिवमेंट पारितोषित देऊन सन्मानित केले. २०२३ मध्ये मला आणि सरिताला म्हणजे आमच्या स्कूलला प्रीमियर फोर्ड द्वारा road safety ambassadors, म्हणून सन्मानित केले. 

जाता जाता  हे ही  नमूद करवसे वाटते की मी व्यवसायानिमित गेल्या ५० वर्षात २५ लाख किलोमीटर गाडीट  फिरलो आहे.      

या सर्व यशात आपल्या मराठी समाजाचा फार वाटा आहे. सुरुवाती पासून मला आपल्या लोकानी भरपूर प्रती साद देऊन मला या यशस्वी होण्यात हातभार लावला, मी आपण सर्वांचा आभारी आहे.    

Leave a Comment