मराठी साहित्यिक चळवळ | मराठी साहित्य संमेलन | स्नेहबंध

मराठी साहित्यिक चळवळ | मराठी साहित्य संमेलन | स्नेहबंध

कुठल्याही भाषेची प्रगती दर्जेदार साहित्यातून घडत असते. मराठी साहित्याला प्रोत्साहान देण्यासाठी आपलं मंडळ दोन साहित्य विषयक उपक्रम राबवत आहे.

१. मराठी साहित्य संमेलन (टोरांटो मधील मराठी साहित्यप्रेमींसाठी - स्थानिक साहित्यिकांनी केलेला प्रयत्न)

२. स्नेहबंध (दर्जेदार मराठी साहित्याने नटलेलं त्रैमासिक)

मनात साठवून ठेवलेल्या भावनांना साहित्याच्या रुपात व्यक्त करण्याची अनमोल संधी.. साहित्य संमेलनातून आपलं लिखाण टोरांटो-वासियांपर्यंत पोहोचवा.. आणि तिथेच न थांबता .. स्नेहबंधाच्या माध्यमातून आपला साहित्यप्रवास अविरत चालू ठेवा ..!!

कथा, कविता, प्रवास-वर्णन, विनोदी, ललित, विवेचनात्मक, वैचारिक लेख...अर्थातच, ही यादी न संपणारी आहे. यापैकी काहीही लिहा आणि लवकरात लवकर आमच्याकडे पाठवा. यासाठी वयाची अट नाही. स्नेहबंधसाठी तर भाषेची सुद्धा अट नाही तरुण आणि बच्चे कंपनी English मधून सुद्धा लिहू शकते.

(साहित्य संमेलन फक्त मराठीतच!!).

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून लेखन कलेची मुहूर्त मेढ रोवुया आणि "MYबोलीचं ऋण" फेडण्याचा अंशतः प्रयत्न करूया.

..मग चला तर मंडळी .....फुटू द्या आपल्या प्रतिभेला धुमारे...भरपूर लिहा, छान छान लिहा आणि आम्हाला पाठवा - खालील इमेल पत्त्यावर -:

१. साहित्य संमेलना साठी

संमेलनात सहभागी होण्यासाठी आपले साहित्य prandsm@mbmtoronto.com या पत्त्यावर मार्च १६, २०१८ पर्यंत पाठवावेत

महत्वाचे : आपले साहित्य वाचून दाखवण्यासाठी सहभागींना 5 मिनिटे वेळ देण्यात येईल. त्या हिशोबाने साहित्य लेखन अपेक्षित आहे.

साहित्य संमेलन नोंदणी (आवश्यक): https://www.eventbrite.ca/e/43211687320

साहित्य संमेलन: अधिक माहिती: 
अमेय गोखले - ६४७ ७१३ २४६९

२. स्नेहबंध साठी - शेवटची तारीख - १० मार्च
आपले लेख या पत्त्यांवर पाठवा:

Dattaguru@gmail.com
shubh8668@gmail.com

स्नेहबंध: अधिक माहिती: 
दत्तगुरु महाबळ - ६४७ २९६ ८०४४
शुभदा वकनाल्ली - ६४७ २२१ १५७६

धन्यवाद,
मराठी भाषिक मंडळ टोरांटो